मलायकानंतर ‘ही’ अभिनेत्री नवर्‍याला देणार घटस्फोट, 10 वर्षाचं नातं संपुष्टात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये अनेकांचे ब्रेकअप आणि पॅचअप होत असते. कधी कोणाचे तरी अफेअर सुरु असते तर कोणाचे नाते संपलेले असते. ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आमिर अली आणि संजीदा शेख. हे दोघे टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कुटुंबियांच्या संमंतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केले. मात्र आता यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

https://www.instagram.com/p/Bz-jki1jhqC/

https://www.instagram.com/p/ByXiKB4jsTE/

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे नाते संपुष्ठात आले आहे. मात्र यामागचे कारण अद्याप कळाले नाही. या दोघांनी सोशल मीडियावर देखील एकमेकांना अनफॉलो केले आहे. या दोघांनी अद्याप घटस्फोट घेतला नाही मात्र लवकरच संजीदा आमिरला घटस्फोट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे रोमॅन्टिक फोटो इतरांना कपल गोल देत असले तरी रिअल लाईफमध्ये यांचे नाते फेल असल्याचे ठरले आहे. हे दोघे वेगळ होण्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

https://www.instagram.com/p/Bycw0oHjrWz/

https://www.instagram.com/p/BuT8rQhjX72/

संजीदा शेखने ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ती गेली अनेक वर्षे झाले छोट्या पडद्यावर काम करत आहे. ‘जाने पहचाने से अजनबी’, ‘एक हसिना थी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तिच्या अनेक मालिका चाहत्यांच्या पसंतीस पडल्या आहे.

https://www.instagram.com/p/BufrEx2D0J_/

https://www.instagram.com/p/Bt2nGkADap-/

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/