भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसर्‍यांदा ‘कोरोना’

पोलिसनामा ऑनलाईन – नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना एकाच महिन्यात दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुटूंबियासह कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचा ऑगस्ट महिन्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर ते घरी परतले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर चिखलीकर यांनी औरंगाबाद येथे उपचार घेतले होते. त्यानंतर ते नांदेडला आले. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी नांदेडमध्ये त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर ते दिल्लीला गेले. अधिवेशनापूर्वी पुन्हा त्याची चाचणी झाली आणि त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून आता ते दिल्लीतील निवासस्थानी आहेत. मात्र, दुसर्‍यांदा कोरोनाची दुसर्‍यांदा लागण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .