मध्यरात्री घरात ‘अशा’ विचित्र हरकती करते श्रुती हासन, फोटो शेअर करून स्वत:च केला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री श्रुती हासन हिनं अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. सध्या ती साऊथच्या इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असल्याचं दिसत आहे. श्रुती सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. श्रुतीनं अनेकदा आपल्या हॉट अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामुळे ती अनेकदा सोशलवर चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे. अलीकडेच श्रुती तिच्या ताज्या सोशल मीडिया पोस्टमुळं चर्चेत आली आहे. हा तिचा एक मेकअपवाला फोटो आहे.

श्रुतीनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचा फोटोही आहे. खास बात अशी की, या पोस्टमध्ये श्रुतीनं तिच्या विचित्र सवयींबद्दल आणि काही हरकतींबद्दल सांगितलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं ही चेकलिस्ट शेअर केली आहे. यात मध्यरात्रीचे मेकअप एक्सपेरीमेंट, चॉकलेट खाणं, सेल्फी शेअर करणं अशा अनेक गोष्टी आहेत.”

लुकबद्दल बोलायचं झालं तर श्रुतीनं ब्लॅक ड्रेस घातला आहे. ओठांना तिनं लाल लिपस्टिक लावली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटोही तिनं मध्यरात्री काढलेला असावा.

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती साऊथ सुपरस्टार धनुष सोबत थ्री या सिनेमात झळकली होती. श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.