अटीतटीच्या लढतीत सिद्धार्थ शिरोळे विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले आहेत. भाजपने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा ‘सामना’ करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना अवघड जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता मतदानानंतर निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी मिरवणूक काढली आहे.

अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत सिद्धार्थ शिरोळे यांनी आघाडी घेतली होती. 18 व्या फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यावर आघाडी घेतली. तर 19 व्या फेरीत विजयी आघाडी घेत विजय संपादीत केला. शिरोळे यांनी 5 हजार पेक्षा अधिक मतांनी बहिरट यांचा पराभव केला. पहिल्या फेरीमध्ये दत्ता बहिरट हे आघाडीवर होते. त्यांना 308 मते मिळाली होती. पहिली फेरीत पोस्टल मतांची मोजणी झाली.

या मतदार संघामध्ये तीन लाख पाच हजार 587 मतदार आहेत. त्यात्यील एक लाख 33 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील औंधमधून 52 टक्के, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातून 51 टक्के मतदान झाले होते.

Visit : Policenama.com