Side Effects Of Rajma | ‘या’ लोकांनी राजमाचे जास्त सेवन करणे टाळले पाहिजे, जाणून घ्या याचे 6 साईड इफेक्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Of Rajma | ‘राजमा-चावल’चे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. राजमा (Rajma) आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Beneficial For Health) आहे. किडनी बीन्स (Kidney Beans) मध्ये प्रोटीन (Protein), फायबर (Fiber), कॅल्शियम (Calcium), स्लो रिलीझ होणारे कार्बोहायड्रेट (Slow Releasing Carbohydrate), आयर्न (Iron), व्हिटॅमिन सी (Vitamin C), मॅग्नेशियम (Magnesium) आणि फोलेट (Folate) इत्यादी मुबलक प्रमाणात असते, जे ब्लड शुगर (Blood Sugar), डायजेशन (Digestion), कर्करोग प्रतिबंध (Cancer Prevention), वजन कमी करणे (Weight Loss), मधुमेह (Diabetes) दूर करण्यास मदत (Side Effects Of Rajma) करते.

 

ओन्ली माय हेल्थ नुसार, जर आपण त्याच्या दुष्परिणामांबद्दल (Side Effects) बोलायचे, तर किडनी बीन्समुळे काही लोकांना हानी पोहोचू शकते. कोणत्या लोकांनी राजमा खाऊ (Side Effects Of Rajma) नये ते जाणून घेवूयात…

 

या लोकांनी राजमा खाणे टाळावे (These People Should Avoid To Eat Rajma)

1. पोटाशी संबंधित समस्या असल्यास (If You Have Stomach Related Problem)
ज्या लोकांना पोटात गॅस (Flatulence), दुखणे, मुरडणे, अ‍ॅसिडिटी (Acidity) यासारख्या समस्या आहेत त्यांनी राजमा खाणे टाळावे. राजमामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम (Effects On Digestive System) होऊ शकतो.

 

2. वजन कमी असल्यास (If You Are Low Weight)
राजमामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. अशा स्थितीत राजमा खाल्ल्यानंतर बराचवेळ भूक लागत नाही. अशावेळी, जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल किंवा तुम्ही खूप पातळ असाल, तर राजमाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

3. पित्त दोष असल्यास कमी करा राजमाचे सेवन (Reduce The Intake Of Rajma In Case Of Bile)
ज्या लोकांना पित्तदोषाची समस्या (Bile Problem) आहे त्यांनी राजमा खाणे टाळावे. राजमाचा प्रभाव खूप उष्ण असतो, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना राजमा खाण्याने त्रास होऊ शकतो.

4. गरोदरपणात खाऊ नका राजमा (Do Not Eat Rajma During Pregnancy)
गरोदरपणात (Pregnancy) राजमा खाणे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे, परंतु गरोदरपणात राजमा जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्टोन (Stone), संधिवात (Arthritis), गॅस (Gas) आणि क्रॅम्प्स (Cramps) होऊ शकतात, त्यामुळे गरोदरपणात राजमाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

 

5. आयर्न जास्त असेल तर (More Iron)
किडनी बीन्समध्ये भरपूर आयर्न (Iron) असते. यामुळे शरीरात आयर्न जास्त असल्यास किडनी बीन्समुळे नुकसान होऊ शकते.
अशा स्थितीत राजमा खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या होऊ शकतात.

 

6. बद्धकोष्ठतेच्या समस्येत खाऊ नका राजमा (Do Not Eat Kidney Beans In The Problem Of Constipation)
किडनी बीन्स पचायला जड असतात, त्यामुळे बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या वाढू शकते.
तसेच राजमामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Rajma | rajma side effects do not consume kidney beans in these conditions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

 

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार