Lockdown : तुम्ही ‘सेक्स’ पार्टनरची सोय करा, ‘इथं’ सिंगल लोकांना सरकारनं दिला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेदरलँडमध्ये देखील कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लॉकडाऊन केले आहे. परंतु काही अटींसह लोक घरी तीन पाहुण्यांना बोलावू शकतात. तसेच आता सरकारने सिंगल पुरुष आणि महिलांना सेक्स पार्टनर शोधण्याचा सल्ला दिला आहे. सेक्स पार्टनरची व्यवस्था करताना सरकारने काही गोष्टी लक्षात ठेवण्यासही सांगितल्या आहेत.

नेदरलँड्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड एनवायरमेंट (आरआयव्हीएम) ने म्हटले आहे की, सिंगल लोकांनी दुसर्‍या व्यक्तीबरोबर राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. मात्र, एखाद्याला कोरोनाची लक्षणे असल्यास त्याने सेक्सपासून दूर रहावे.

यापूर्वी नेदरलँड्समध्ये सिंगल लोकांना लैंगिक संबंधाबाबत कोणताही सल्ला दिला जात नाही अशी टीका सरकार होत होती. नेदरलँडमध्ये २३ मार्चपासून सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊन लागू केले गेले आहे.

आधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सरकारने असे म्हटले होते की, जेव्हा कोणी भेटण्यास घरी आल्यावर १.५ मीटर अंतर ठेवावे. लोक या नियमावर प्रश्न विचारत होते.

RIVM च्या सल्ल्यामध्ये म्हटले गेले होते की, ज्या लोकांकडे कायमस्वरूपी सेक्स पार्टनर नाहीत, ते त्यांच्या प्रकारच्या लोकांसह राहण्याचा करार करू शकतात. या दरम्यान दोन पार्टनर इतर किती लोकांना भेटतील यावरही चर्चा करण्यास सांगितले गेले. कारण जितक्या अधिक लोकांना भेटू, कोरोनाचा धोका तितका अधिक सांगितला गेला आहे.