गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी चोरल्या सहा लाखांच्या मोटार सायकली

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी दोन महाविद्यालयीन विद्धार्थी गुन्हेगारी जगताकडे वळले आहेत. चैन करण्यासाठी तसेच गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी या मुलांनी  दुचाकी चोरल्या होत्या. या दोन्ही गुन्हेगारांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तब्बल सहा लाख रुपये किंमतीच्या 12 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नावे साहिल मौला पटेल (वय 21 वर्ष) आणि दगडू रामा कुकडे (वय 19 वर्ष) अशी आहेत. दोघेही महाविद्यालयात सध्या पदवीचं शिक्षण घेत आहेत.

गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी आणि चैन करण्यासाठी साहिल पटेलकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने बाईक चोरीचा मार्ग अवलंबून दुचाकी चोरीची सत्रच सुरु केले, असे पोलीस तपासात साहिल पटेल यांने कबुल केले. दोघा आरोपीनी सांगलीत सात, तर अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच अश्या एकुण 12 दुचाकी लपास केल्याचे तपासात उघड झाले.

सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ढालगावमध्ये छापा टाकून ही कारवाई केली आहे. सांगली शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यापासुन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती.  जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा आणि अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्यांची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b700002-bcde-11e8-a6c3-0f90a66efad3′]

मुख्य म्हणजे, चोरलेल्या दुचाकी ते फक्त ओळखीच्या व्यक्तींना विकत असत. त्यांनी अवघ्या दहा ते पंधरा हजारात सर्व गाड्या विकल्या होत्या. कागदपत्रे पुन्हा देतो, असं सांगून त्यांनी या दुचाकींची विक्री केली होती. साहिल हॅण्डल लॉक न केलेल्याच दुचाकी चोरीत तर, दगडू दुचाकी विकण्यास मदत करत असे. याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.