हृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी सकाळचा नाश्ता आवश्य घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सकाळी सर्वच जण नाश्ता घेत असतात. परंतु, डाएट करणारे अनेकजण सकाळचा नाष्टा टाळतात. कधीकधी कामाची वेळच अशी असते की सकाळचा नाश्ता न घेता थेट दुपारचे जेवण घेतले जाते. परंतु, सकाळी नाश्ता न केल्याने जीवाला धोका होऊ शकतो. सकाळी नाश्ता न केल्यास हृदयरोगांचा धोका अनेक पटीने वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

प्रिवेन्टिव कार्डिओलॉजीच्या यूरोपीय जर्नल द फाइंडिग्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अशाप्रकारची जीवनशैली असणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यू होण्याचा धोका ४ ते ५ पटीने वाढतो. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. याबाबत संशोधकांनी केलेल्या संशोधनातून हे समोर आले की, जेवण करण्याच्या किंवा काहीही खाण्याच्या चुकीच्या पद्धती सतत वापर राहिल्याने आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो, खासकरुन हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे संशोधन करण्यासाठी हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या ११३ रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. त्यांचे सरासरी वय ६० वर्षे होते. यातील ७३ टक्के पुरुष होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले की, सकाळी नाश्ता न करणारे रुग्ण ५८ टक्के होते, तर रात्रीचे जेवण उशीरा करणारे ५१ टक्के रुग्ण होते. आणि ४८ टक्के रुग्णांमध्ये दोन्ही सवयी आढळल्या. या संशोधनानंतर संशोधकांच्या पथकाने असा सल्ला दिला आहे की, खाण्याची सवय सुधारण्यासाठी रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत कमीत कमी २ तासांचे अंतर असावे. एका चांगल्या नाश्त्यात जास्तीत जास्त फॅट फ्री किंवा लो फॅट डेअरी पदार्थ जसे की, दूध, दही आणि पनीर, कार्बोहायडेट्ससाठी चपाती, भाजलेले ब्रेड, कडधान्य आणि फळांचा समावेश असावा. नारळ पाणी कधीही पिऊ शकता.

पण सकाळी नारळ पाणी पिण्याचे फायदे आहेत. नारळ पाण्याला कॅलरी डिंकही म्हटले जाते. यात अ‍ँटीऑक्सीडेंट्स, अमीनो-अ‍ॅसिड, एंजाइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आढळतात. या गुणांमुळे महिलांची इम्यून सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच नारळाच्या पाण्यामुळे त्वचाही तजेलदार होते. नारळाच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे सकाळी नाश्ता करता आला नाही तर नारळाचे पाणी प्यावे. रोज एक सफरचंद खावे. यामध्ये फ्लावनोईड अधिक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ती समस्या दूर होते. दुधात अनेक आरोग्यदायी पोषक तत्वे असतात. त्यामुळे वय कोणतही असो रोज सकाळी एक ग्लास दूध प्यायल्यास फायदा होतो.

दुधामुळे दिवसभर एनर्जी मिळते. दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे त्वचा, केस आणि हाडे मजबूत होतात. तसेच रोज एक ग्लास दूध प्यायल्यास अनेक आजार दूर राहतात. रात्री काळे चणे भिजवून ठेवून त्याचा सकाळी नाश्ता केल्यास चांगला फायदा मिळतो. काळे चणे खाल्ल्यास प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन अधिक प्रमाणात मिळतात. याने दिवसाची सुरुवात चांगली होते. दिवसभर थकवा जाणवत नाही. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता एकत्र खाल्ल्यास फायदा होतो. डायफ्रूट्समध्ये एनर्जीचा मोठा स्त्रोत असतो. त्यासोबतच डायफ्रूट्स खाल्ल्याने आयुष्यही वाढते. यामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन अधिक असतात.