‘Slumdog Millionaire’ मधील अभिनेत्री रूबीना अलीच्या वडिलांचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्कर पुरस्कार विजेता सिनेमा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ मध्ये काम केलेली अभिनेत्री रुबीना अलीच्या वडिलांचे काल ३० जानेवारी रोजी निधन झाले. रुबीनाचे वडिल रफीक कुरैशी अनेक दिवसांपासून Tuberculosis या आजाराने ग्रस्त होते. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रुबीना जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिने स्लमडॉग मिलेनियममध्ये काम केले होते. 300 मुलांच्या ऑडिशननंतर तिची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. आता ती 21 वर्षाची आहे आणि वडिलांच्या घरापासून लांब राहते. रुबीनाने जय हो ट्रस्टने दिलेले रॉयल कोर्ट बिल्डिंगमधील घर सोडले आणि ती आईसोबत नालासोपारा येथे राहते. तिचे वडिल सावत्र आई आणि त्यांच्या पाच मुलांसोबत वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये राहतात.

रुबीनाला वांद्र्याचे घर विकून मोठ्या ठिकाणी घर घ्यायचे होते. पण वडिलांना तिथून काढणे तिला योग्य वाटले नाही. अशा परिस्थितीत काय करावे हा विचार करुन तिने घर तसेच ठेवले. सध्या ती फक्त आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे.

बीएच्या प्रथम वर्षात शिकणारी रूबीना अली फॅशन डिझाइनचे शिक्षणही घेत आहे. याशिवाय तिने मेकअपचा कोर्सही केला आहे. सध्या रुबीना अली एका मेकअप स्टुडिओमध्ये पार्ट टाइम नोकरी करत आहे.