एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करणारे गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहण करणा-या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना ३ जून रोजी रात्री दीड ते पहाटे पाचच्या सुमारास पद्मानगर येथे घडली होती. पोलिसांनी एक वर्षाच्या कुमार आशिक चंदुल हरजन या चिमुकल्याची सुखरुप सुटका करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रोहित प्रदीप काटोकर (वय-२३ रा. भिवंडी) आणि सूरज सोनी (रा. पद्मानगर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कर्ज फेडण्यासाठी मुलाचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

अपहरण झालेल्या मुलाचे उत्तर प्रदेशाताली नेपाळ हद्दीला लागुन असलेल्या गावात विक्री केल्याचे आरोपींनी सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्हुई तालुक्यातील एकसवाडा येथून एका महिलेच्या ताब्यातून मुलाला ताब्यात घेतले. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाला विकत घेणा-या एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रविण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शोध -१ ठाणे एन.टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस नाईक मेघना कुंभार यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

Loading...
You might also like