‘या’ कारणामुळं मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट मुंबई प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने (RPO) जप्त केला आहे. ऑक्टोबरमध्ये कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मध्यप्रदेशात मेधा पाटकर यांच्यावर 9 गुन्हे दाखल होते. याची माहिती त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला दिली नव्हती. हीच माहिती लपवण्याप्रकरणी मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. कारणे दाखवला नोटीस पारपत्र कार्यालयाकडून ऑक्टोबर महिन्यात बजावण्यात आली होती.

2017 साली मेधा पाटकर यांना पासपोर्ट जारी करण्यात आला होता. पासपोर्टची मुदत 10 वर्ष होती. त्यानंतर 9 गुन्हे लपवण्याचा ठपका ठेवत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

मेधा पाटकर यांच्या विरोधात दाखल गुन्हे हे मध्य प्रदेशात बडवानीमध्ये 3, अलीराजपूरमध्ये 1, खंडवामध्ये 5 असे आहेत. कारणे दाखवा नोटीसमध्ये सांगण्यात आले की त्यांना 30 मार्च 2017 साली पासपोर्ट प्राप्त झाला होता. परंतू यानंतर त्यांनी विविध प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती दिली नव्हती. ही माहिती लपवून त्यांनी पासपोर्ट प्राप्त केला.

नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी मेधा पाटकर यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यालयाकडून वेळ मागून घेतला होता. न्यायालय आणि पोलिसांकडून कागदपत्र घेण्यास वेळ लागेल असे त्यांनी सांगितले होते. आठवड्याभरापूर्वी त्यांनी केलेली ही विनंती फेटाळून लावण्यात आली आणि 7 दिवसात पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले. मेधा पाटकर म्हणाल्या की काही प्रकरणं शांततेच्या मार्गाने न्याय मिळवून देण्याबाबत होते.

नोटीसमध्ये पासपोर्ट अधिनियम 1967 नुसार कलम 10 (3) ई नुसार आपला हा पासपोर्ट आणि त्यानंतर तुम्ही कोणता पासपोर्ट जारी केला असेल तर तो जप्त करण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले आहे. याअंतर्गत तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये असे विचारण्यात आले होते.

मेधा पाटकर यांना 10 दिवसात उत्तर द्यायचे होते. या वर्षी जून महिन्यात एका पत्रकाराने मेधा पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हणले होते की, पाटकर यांनी मुंबई पासपोर्ट कार्यालयाकडून माहिती लपवून पासपोर्ट मिळवला आहे. विशेष म्हणजे उत्तर देण्यासाठीची मुदत संपल्यावर 1 महिन्यापासून अधिक कालावधी उलटून गेले आहे. 2014 मध्ये आपच्या तिकिटावर मेधा पाटकर यांनी उत्तर पूर्व मुंबईत लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतू त्यात त्यांचा पराभव झाला होता.

Visit : policenama.com