… म्हणून ‘आकडे’वारी ‘घोषित’ करण्यासाठी ‘उशीर’, दिल्ली विधानसभेसाठी 62.59% मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 672 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे. दिल्ली निवडणुकीत 70 जागेसाठी एकूण मतदान किती टक्के झाले हे लवकर समजले नाही. निवडणूक मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. आज (रविवार) उशीरा निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणुकीची टक्केवारी जाहीर केली आहे.

विधानसभा मतदानानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. अखेर निवडणूक आयोगाने कामाचा ताण आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यस्ततेमुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशिर झाल्याचे सांगितेल. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेला 67.1 टक्के मतदान झाले होते.

बल्लीमरान येथे सर्वाधिक 71.6 टक्के मतदान झाले. तर दिल्ली कँटमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 45.4 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानाच्या अंतिम टक्केवारीची एक प्रतिक्रिया असते. मतदान प्रक्रियेनंतर जेव्हा डेटा येतो, तेव्हा तो सर्व्हरला जोडला जातो. त्यानंतरच डेटा शेअर केला जातो. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून उशीर झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.