सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली कोन्हाळीच्या यल्लमा देवीची यात्रा रद्द

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन –   संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात तसेच शेजारच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोन्हाळी येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा देवस्थान कमिटी आणि यात्रा पंच कमिटीने घेतला आहे. कोन्हाळी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला. श्री यलाम्मा देवीची यात्रा मंगळवारदिनांक 12 मे 2020 पासून सुरू होणार होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न करण्याचा निर्णय सर्वानुमते देवस्थान ट्रस्टी व पुजारी यांनी घेतला आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे हि विनंती आहे असे आवाहन भिमाशंकर पुजारी आणि पिरप्पा पुजारी यांनी केले असून अधिक माहितीसाठी 7499153856 या नंबर वर संपर्क करावे असे कळविले आहे.

पोर्णिमा झाल्यापासुन येणाऱ्या मंगळवारी ही यात्रा भरत असते यात्रेत पहाटे पासुन शिडी खेळतात आणि दुसरा दिवशीं कुस्ती होत असतात पण हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.अशी माहिती देवस्थान कमिटी व जत्रा कमिटीने पत्रकार महेश गायकवाड यांच्याशी बोलतांना दिली.