पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना विशेष सेवापदक पुरस्कार जाहीर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) : पुरंदर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी ) पोलीस अधीक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांना नुकताच विशेष सेवापदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णासाहेब जाधव यांची गतवर्षी गडचिरोली येथून बदली झाल्यानंतर ( डीवायएसपी ) पोलीस उपअधीक्षक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग येथे बदली झाली.

महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये समाधानकारक सेवा, कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार पोलीस यंत्रणेकडून सन्मान केला जातो. याप्रमाणे सासवड येथील (डीवायएसपी) पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांनी गडचिरोली येथे पोलीस आणि जनता यांच्यामधील संबंध सुधारणे, सामाजिक उपक्रमात सहभाग, नक्षलविरोधी कारवाईत सहभाग यांसह अन्य उपक्रमात जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल नुकतेच विशेष सेवापदक पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झाला आहे.

हा विशेष सेवापदक पुरस्कार पुणे येथील पोलीस अधीक्षक कार्यालय पाषाण या ठिकाणी २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्तकदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलीस आयुक्त, उपायुक्त, पोलीस अधीक्षक उपाध्यक्षांसह या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीसबांधव उपस्थित राहणार आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/