राज्य सरकार आहे इथे, तेच बोलतील ! अजित पवारांकडे इशारा करत शरद पवारांची कार्यक्रम स्थळावरून ‘एक्झिट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणातील बारीक सारीक माहिती आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही विषयावर आपली भूमिका ठामपणे मांडत असतात. पत्रकार परिषदेमध्ये ते पत्रकारांसोबत मनमोकळेपणाने बोलत असतात. मात्र आज पुण्यात शरद पवारांनी एका कार्यक्रमस्थळाहून घेतलेली एक्झिट चर्चेचा विषय बनली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटूट मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. सभा संपल्यानंतर शरद पवार पत्रकारांसोबत संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत चर्चा सुरु केली. त्यावेळी अजित पवार  (हे इमारतीच्या आवारात दूरवर उभे होते.

सभा संपल्यानंतर शरद पवार यांनी सभेतील निर्णय आणि राज्यातील घडामोडींवर बोलावे अशी विनंती शरद पवार यांना पत्रकारांनी केली. त्यावेळी शरद पवार यांनी दूरवर उभे असलेल्या अजित पवार यांच्याकडे इशारा करत राज्य सरकार इथेच आहे, तेच बोलतील असे सांगितले. त्यावेळी अजित पवारांकडे हाताचा इशारा दाखवायला ते विसरले नाही. यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्यासोबत चर्चा करून पत्रकारांसमोर न येता तेथून निघून गेले. यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पण अशाप्रकारे अचानक कार्यक्रमस्थळाहून अध्यक्ष शरद पवारांनी घेतलेली ‘एक्झिट’ मात्र चर्चेचा विषय ठरली.