2 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न सांगणार्या ज्येष्ठ महिलेच्या स्विस खात्यात 196 कोटी रूपयांचा ‘ब्लॅकमनी’, आता टॅक्ससह लागणार दंड
मुंबई : 1.7 लाख रुपये वार्षिक म्हणजे सुमारे 14 हजार रुपये मासिक उत्पन्नाचा दावा करणार्या 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या स्विस बँक खात्यात 196 कोटी रूपयांचा काळापैसा सापडला आहे. इन्कम टॅक्स अपीलेट ट्रीब्यूनलच्या (आटीएटी) मुंबई शाखेच्या आदेशानंतर आता आरोपी महिलेला टॅक्ससह पेनल्टी सुद्धा भरावी लागणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.
आठ दशकांचे वय पार केलेल्या रेणु थरानी यांचे एचएसबीसी जिनेव्हामध्ये अकाऊंट आहे. स्विस बँकेत थरानी फॅमिली ट्रस्ट नावाचा या बँकेत एकमेव विवेकाधीन लाभार्थी आहे. मन आयलँड आधारित जीडब्ल्यू इन्व्हेस्टमेंटच्या नावावर हे जुलै 2004मध्ये उघडण्यात आले. या कंपनीने व्यवस्थापकाच्या रूपात फंड फॅमिली ट्रस्टला ट्रान्सफर केला.
थरानी यांनी 2005-06 मध्ये दाखल आयटी रिटर्नमध्ये याची माहिती दिली नाही. हे प्रकरण पुन्हा 31 ऑक्टोबर 2014 ला उघडण्यात आले. थरानी यांनी एक शपथपत्र देऊन हेदेखील म्हटले की, त्यांचे एचएसबीसी जिनेव्हामध्ये कोणतेही बँक खाते नाही आणि त्या जीडब्ल्यू इन्व्हेस्टमेंट बँकेत डायरेक्टर किंवा शेयरहोल्डर नव्हत्या. त्यांनी स्वताला नॉन रेसिडेंट असल्याचे सांगितले आणि दावा केला की, जर कुठली रक्कम असेल तर त्यांच्याकडून टॅक्स घेतला जाऊ शकत नाही.
2005-06 च्या आयटी रिटर्नमध्ये थरानी यांनी सांगितले की, त्यांचे वार्षिक उत्पन्न अवघे 1.7 लाख रुपये आहे. त्यांनी यामध्ये बेंगळुरुचा पत्ता दिला होता आणि आपले टॅक्सपेयर स्टेटस भारतीय नमूद केले होते. आयटीएटी बेंचने म्हटले की, असे होऊ शकते की, तेव्हा या नॉन रेसिडेंशियल स्टेटसच्या पहिल्या वर्षात असतील, परंतु इतक्या कमी वेळात 200 कोटी रूपये खात्यात कुठून आले.
त्यांनी अगोदर जेवढे उत्पन्न सांगितले त्या हिशेबाने ही रक्कम जमा होण्यास 11,500 वर्ष लागतील. पीठाने हे देखील सांगितले की, टॅक्सपेयर मदर टेरेसा यांच्यासारखी पब्लिक फिगर सुद्धा नाही की कुणी त्यांच्या ट्रस्टला एवढी मोठी रक्कम दान दिली असेल.