COVID-19 : ‘मास्क’चा वापर केल्यानं संसर्गाचा धोका 75 % होतो कमी, संशोधनात खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मास्क वापरल्याने संसर्गाचा धोका 75 टक्क्यांनी कमी होतो. हाँगकाँग स्टडीज ट्रान्समिशनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. यानुसार, मास्क न वापरल्याने जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तात्काळ व्हायरसची लागण होण्याचा धोका आहे.

संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगात आढळून आले की, मास्क न वापरणारे उंदीर एक आठवड्याच्या आत बाधित झाले. काहींना मास्क घालून संक्रमित पिंजर्‍यात ठेवण्यात आले होते, तेव्हा केवळ 16 टक्क्यांना संसर्ग झाला. केवळ निरोगी उंदरांना मास्क घातला असता फक्त 33 टक्क्यांना संसर्ग झाला.

एसिम्प्टोमॅटिकपासून सुद्धा बचाव

मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. यूएन क्वाक-युंग यांच्यानुसार, मास्क वापरल्याने तुम्ही त्या रूग्णांपासून वाचू शकता, ज्यांच्यामध्ये संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत. अशा रूग्णांना एसिम्प्टोमॅटिक म्हटले जाते. एवढेच नव्हे, जर तुम्ही गंभीर संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये राहिलात आणि सर्जिकल मास्क वापरला तर तुमचा धोका 50 टक्के कमी होतो.