सुशांत सिंह राजपूतच्या पुर्वी बॉलिवूडमधील ‘या’ 6 सुप्रसिध्द कलाकारांनी देखील अचानक मृत्यूला कवेत घेऊन फासाच्या दोरीला ‘रडवलं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आज मुंबईत आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. बॉलिवूड चाहत्यांसाठी ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. तो आत्ता बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट युवा अभिनेत्यांमध्ये गणला जात होता. यापूर्वीही बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आत्महत्या करून आपल्या चाहत्यांना रडवले आहे.

कुशल पंजाबी

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कुशल पंजाबीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत आत्महत्या केली होती. सलाम-ए-इश्कमध्ये प्रियंका चोप्रासोबत त्याने काम केले होते. याशिवाय 2004 मध्ये आलेल्या ‘लक्ष्य’ आणि 2005 मधील ‘काळ’ या चित्रपटातही त्याने भूमिका केली. याशिवाय त्याने अनेक टीव्ही कार्यक्रमही केले.

जिया खान

2013 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने मुंबईतील घरात आत्महत्या केली होती. केवळ 25 वर्षांच्या जियाने जेव्हा हे पाऊल उचलले तेव्हा ती गर्भवती होती. या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोली यांचे नाव समोर आले आहे. जीया खानने छोट्या चित्रपट कारकीर्दीत निशब्द, हाऊसफुल, गजनी यासारख्या चित्रपटात काम केले होते.

दिव्य भारती

बॉलिवूड अभिनेत्री दिव्य भारतीचा दुःखद मृत्यू कोणीही विसरू शकत नाही. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अनेक हिट चित्रपटात काम करणार्‍या दिव्याचे 1993 मध्ये घराच्या पाचव्या मजल्यावरून पडल्यानंतर निधन झाले. काही लोक म्हणतात कि, तिने आत्महत्या केली, परंतु काही लोक त्याला अपघात म्हणतात. अद्याप हे सत्य एक रहस्य आहे.

गुरुदत्त

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. दरम्यान,त्यांच्या मृत्यूवरही हे स्पष्ट नाही कि, त्यांनी आत्महत्या केली होती कि जास्त नशा केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर 1964 मध्ये ते घरात मृतावस्थेत आढळले. दारूसह झोपेच्या अनेक गोळ्या घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांची पत्नी गीता दत्तशी त्यांचे संबंध चांगले नव्हते आणि अभिनेत्री वहीदा रहमान ज्यांच्यावर ते प्रेम करत होते, ती त्यांच्यापासून दूर गेली होती.

सिल्क स्मिता

सप्टेंबर 1996 मध्ये विजयालक्ष्मी वदलापती उर्फ सिल्क स्मिताने पंख्याला लटकून आत्महत्या केली. सतत अपयशामुळे ती आत्महत्या करत असल्याची एक सुसाइड नोट तिने लिहिली होती.

परवीन बाबी

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी 2005 मध्ये तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळली होती. एकटी राहणारी बाबी जेव्हा शेजार्‍यांकडे वृत्तपत्रे आणि दूध घेण्यासाठी पोचली नाहीत तेव्हा लोकांना संशय आला. त्यानंतर जी बातमी आली त्याने सर्वत्र शोककळा पसरली, बॉबीचे आयुष्य संपले होते. तिला मधुमेहाने त्रस्त होती. असे म्हंटले जाते कि, आजारपण आणि एकाकीपणाला कंटाळून तिने मृत्यूला मिठी मारली.