पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून 6000 रूपयाचा ‘लाभ’ घ्यायचाय तर आत्ताच करा ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुम्हाला 6000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर 31 मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थिती आपले खाते आधारशी लिंक करून घ्या. ज्यांना एक किंवा दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना देखील हे लागू पडते. सरकारचा हा निर्णय जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांनी 31 मार्च 2020 पर्यंत त्यांचा आधार लिंक करून घ्यावा अन्यथा पैसा बंद होईल. तर उर्वरित राज्यांमध्ये 1 डिसेंबर 2019 पासून आधार अनिवार्य करण्यात आला आहे.

कृषी मंत्रालयाच्या मते, जम्मू-काश्मीरमधील 7,91,245 शेतकर्‍यांना योजनेच्या तीन हप्त्यांमधून पैसे मिळाले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात 5,75,202 शेतकऱ्यांनी 2000 रुपयांचा पहिला हप्ता घेतला आहे. मेघालयात एकूण 36,951 शेतकर्‍यांना तिसरा हप्ता मिळाला तर 24,665 शेतकर्‍यांना दुसऱ्या टप्प्यातील पहिला किंवा योजनेचा चौथा हप्ता मिळाला. आसाममधील 19,97,844 शेतकर्‍यांना 2-2 हजार रुपयांच्या तीनही हप्ते मिळाले आहेत, तर 9,53,609 शेतकर्‍यांना दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या हप्त्याचे पैसे प्राप्त मिळाले आहेत.

तसेच, 14.5 कोटी शेतकरी कुटुंबांपैकी केवळ 6.44 कोटी लोकांना 2-2 हजारांचा तिसरा हप्ता मिळाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रांचा अभाव आणि आधार तपशील नसणे, लोकांना पैसे मिळालेले नाहीत. आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दिलेल्या बँक खात्यावर जावे लागेल. तेथे आपल्याकडे आधार कार्डाची फोटो कॉपी घ्या आणि बँक कर्मचार्‍यांना खात्यास आधारशी लिंक करण्यास सांगा.