LPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तेल विपणन कंपन्यांनी डिसेंबर महिन्यासाठी गॅसची किंमत जाहीर केली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या सलग तिसर्‍या महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडर महाग झाले. डिसेंबर महिन्यात तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) अनुदानित गॅसशिवाय 14.2 किलो सिलिंडरची किंमत 594 रुपये ठेवली आहे. इतर शहरांमध्येही घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

19 किलोचा एलपीजी सिलिंडर झाला महाग

– देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1,241 रुपयांवरून 1,296 रुपये झाली आहे. 19 किलो एलपीजी सिलिंडर 55 रुपयांनी महागला आहे. 14.2 किलो सिलिंडरची किंमत 594 रुपये आहे.

– कोलकातामध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1,296 रुपयांवरून 1351.50 रुपये झाली आहे. सिलिंडरच्या किमतीत 55 रुपये वाढ झाली आहे. येथे घरगुती गॅसची किंमत 620.50 रुपये आहे.

– मुंबईत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1189.50 रुपयांवरून वाढून 1,244 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. येथील सिलिंडरच्या किमतीत 55 रुपये वाढ झाली. 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 594 रुपये आहे.

– चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1354.50 रुपयांवरून वाढून 1,410.50 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. येथे सिलिंडरच्या किमतीत 56 रुपयांनी वाढ झाली आहे. येथे 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 610 रुपये आहे.

You might also like