Raksha Bandhan 2020 : अनेक वर्षानंतर येतोय ‘सर्वार्थ-सिद्धी’सह दीर्घायु आयुष्मान ‘योग’, जाणून घ्या शुभ मुहूर्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रक्षाबंधनचा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी (3 ऑगस्ट) ला रक्षाबंधन सण आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण रक्षाबंधन यावेळी अतिशय खास आहे, कारण यावर्षी रक्षाबंधनला सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायु आयुष्मानचा शुभयोग बनत आहे. ज्योतिषाचार्यांच्या नुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी असा शुभ संयोग 29 वर्षानंतर होत आहे. सोबतच या वर्षी भद्रा आणि ग्रहणाचे सावटही रक्षाबंधनावर पडणार नाही.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त –

राखी बांधण्याचा मुहूर्त- 09:27:30 ते 21:11:21 पर्यंत
रक्षाबंधन दुपारचा मुहूर्त – 13:45:16 ते 16:23:16 पर्यंत
रक्षाबंधन प्रदोष मुहूर्त- 19:01:15 ते 21:11:21 पर्यंत
मुहूर्त अवधी : 11 तास 43 मिनिटे

जाणून घ्या शुभयोग

यावर्षी रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायु आयुष्मान योगसह सूर्य शनिचा समसप्तक योग, सोमवती पोर्णिमा, मकरचे चंद्र श्रवण नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र आणि प्रीती योग बनत आहे. यापूर्वी हा योग 1991 मध्ये आला होता. हा संयोग कृषी क्षेत्रासाठी विशेष फलदायी मानला जातो.

अशी सजवा राखीची थाळी

राखीच्या थाळीत रेशमी वस्त्र, केसर, मोहरी, तांदूळ, चंदन आणि गंडा ठेवून देवाची पूजा करावी. यानंतर राखी भगवान शंकराला अर्पण करावी. आता भगवान शंकराला अर्पण केलेली गंडा किंवा राखी भावाच्या मनगटात बांधा.