रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2020 : 41 वर्षाच्या जहीर खाननं हवेत झेप घेत एका हाताने पकडला शानदार ‘कॅच’ (व्हिडीओ)

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ब्रायन लाराच्या विंडीज लीजेंड्सने शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2020 च्या पहिल्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या इंडिया लीजेंड्स टीमसमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या मॅचमध्ये लीजेंड्स क्रिकेटर्सला खेळताना पाहणे फॅन्ससाठी स्मरणीय क्षण ठरले. मॅचच्या दरम्यान लीजेंड्सना खेळताना पाहून फॅन्स आनंदी झाल्याचे दिसत असतानाच ते अनेक आठवणीत ठेवण्यासारख्या क्षणांचेही साक्षीदार झाले. मॅचदरम्यान जहीर खानने एक जबरदस्त कॅच पकडला.

https://twitter.com/man4_cricket/status/1236307941239783424

https://twitter.com/man4_cricket/status/1236309611969380353

मॅचदरम्यान 41 वर्षी जहीर खानने हवेत उडी मारून एक जबरदस्त कॅच पकडला. यामुळे जहीर खानचे सोशल मीडियावर जोरदार कौतूक होत आहे. जहीर खानने मुनाफ पटेलच्या चेंडूवर हा सुरेख कॅच पकडला. जहीर खानच्या हातून कॅच आऊट होऊन रिकार्डो पॉवेलला 1 धाव काढून पॅव्हेलियन मध्ये परतावे लागले. सोशल मीडियावर फॅन्स जहीर खानच्या या कॅचची भरपूर स्तुती करत आहेत. या कॅचसोबत जहीर खानने डारेन गंगाला बोल्डसुद्धा केले. हा चेंडू खुप मस्त होता. या विकेटसह जहीर खानने इंडिया लीजेंड्सला ब्रेकथ्रू दिला. 24 चेंडूत पाच चौके मारून 32 धावा बनवल्यानंतर डारेन गंगा जहीर खानच्या चेंडूवर बोल्ड झाला.

https://twitter.com/AvRajpurohit1/status/1236312526133977088

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विंडीज लीजेंड्सने शिवनारायण चंद्रपाल (61) आणि डारेन गंगा (32) यांच्या उत्तम फलंदाजीच्या मदतीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये आठ विकेटवर 150 धावा केल्या. चंद्रपालने 41 चेंडूत सहा चौके आणि दोन षटकार लगावले. इंडिया लीजेंड्सकडून जहीर, मुनाफ आणि ओझा यांनी तीन-तीन विकेट घेतल्या. तर इरफान पठान एक विकेट मिळाली.