‘माझा अपमान केला जातोय’, संजय राऊतांनी सांगितलं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राज्यसभेमध्ये सीट बदलण्यावरून नाराज झालेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती एम. नायडू यांना पत्र लिहून भाजपाप्रणित एनडीएवर जोरदार हल्ला केला.

तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत जागा बदलण्यावरून राऊत यांनी व्यंकय्या नायडूं यांना पत्र लिहून सांगितले की, “आपणास ऐकून आश्चर्य वाटेल की, राज्यसभेमध्ये त्यांची सीट तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली आहे. हा निर्णय काही लोकांकडून घेण्यात आला आहे कारण की, शिवसेनेच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या जाव्यात व आमचा आवाज दाबला जावा.”

त्यांनी पुढे लिहिले की, एनडीएतून बाहेर पडण्याची शिवसेनेची कोणतीही औपचारिक घोषणा न करता असे पाऊल उचलणे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या निर्णयाचा परिणाम सभागृहाच्या मर्यादेवर झाला आहे. मी अशी विनंती करतो की, पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेतील सीटचे वाटप करून सभागृहाची मर्यादा राखावी.

राऊत यांनी व्यंकय्या नायडूं यांच्यावरही प्रश्न उपस्थित करत सांगितले की, राज्यसभेमधील चेअरमन हा पक्षाच्या विचारधारांच्या वरती जाऊन विचार करत असतो त्यामुळे त्यांनी निष्पक्षपणे निर्णय घेतले पाहिजे.

Visit :  Policenama.com