सीरियावर तुर्कीचा हल्ला ! 60 हजार लोकांना घर सोडावं लागलं, 4 लाख जणांचा जीव धोक्यात

दमास्कस(सीरिया) : वृत्तसंस्था – ईशान्य सीरियात तुर्कीने गुरुवारी (10 ऑक्टोबर) ला केलेल्या हल्ल्यात एका दिवसातच 60,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. त्यापैकी अधिक लोक पूर्वेकडील हसाकेह शहराकडे जात आहेत. सीरियन ऑब्ज़र्वटरी फॉर ह्यूमन राइट्स या संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे .

संघटनेचे प्रमुख रमी अब्देल रहमान यांनी सांगितले की, जास्तीत जास्त विस्थापन रास-अल आयिन, ताल अब्याद आणि देरबशिया सीमेवर झाले आहे. आंतरराष्ट्रीय इशारे देऊनही तुर्की-समर्थक सीरियन बंडखोरांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) ला कुर्दिश-नियंत्रित ईशान्य सीरियामध्ये सैनिकी कारवाई केली. प्रारंभी, हवाई हल्ले व गोळीबारानंतर सैनिकांनी परिसरातील महत्त्वाच्या सीमा भागात कारवाई केली.

विशेष म्हणजे 2011 मध्ये सिरियामध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर त्याच्या सीमेवर आलेल्या 36 लाख निर्वासितांसाठी सीरियन सीमेच्या 30 किलोमीटरच्या आत अंकाराला बफर एरिया तयार करायचा आहे.

मानवतावादी संघटनेने ईशारा दिला आहे की, अलीकडील घटनेमुळे आठ वर्षांच्या संघर्षातील नागरिकांसाठी अधिक जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सीरियन-तुर्की सीमेच्या पाच किलोमीटरच्या परिघात चार लाख 4,50,000 हजार लोक असून सर्व बाजूंनी संयम न बाळगल्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले नाही तर त्यांना सर्वाधिक धोका आहे, असेही संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर 14 मानवतावादी संघटनांनी सही केली आहे आणि चेतावणी दिली आहे की तेथे मोठ्या संख्येने लोक असतील ज्यांना मदत करता येणार नाही.

काय आहे प्रकरण?-

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरिया-तुर्की सीमेवरील तैनात असलेले अमेरिकेचे सैन्य मागे हटविण्याची घोषणा केली होती. तुर्कीने स्वतःच्या समस्येवर उपाय शोधावा असे ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिकन सैन्य मागे हटले तर आम्ही सीरियावर हवाई हल्ले करू अशी धमकी तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांनी दिली होती. हा हल्ला म्हणजे सीरियातील इसिस आणि कुर्द बंडखोरांविरुद्ध कारवाई आहे असा दावा तुर्कीने केला आहे.

 

visit : Policenama.com