तुमचे एका पेक्षा जास्त बँक खाते असतील तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा सर्व पैसे होतील ‘कट’, जाणून घ्या
अनेक बँक अकाऊंट असण्याचा फायदा –
बँकेच्या दिवाळखोरीत असताना केवळ 1 लाख रुपयांपर्यंत तुमच्या ठेवीची हमी देते. अशा परिस्थितीत लोक बर्याच बचत खात्यांमध्ये छोटी ठेव ठेवण्यास प्राधान्य देतात.
अनेक बँक अकाऊंट असण्याचे तोटे –
1) किमान शिल्लक ठेवा –
अनेक बँक खाती असण्याचा पहिला तोटा म्हणजे ग्राहकांना प्रत्येक खात्यामध्ये किमान मासिक सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे. असे न केल्यास बँक शुल्क आकारते. हा नियम सर्व बचत खात्यांना लागू आहे. अशा परिस्थितीत ज्या खात्याचा वापर केला जात नाही अशा खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणे अवघड होते.
2) प्राप्तिकर रिटर्न भरणे –
आयकर विवरणपत्रात तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांचा तपशील द्यावा लागेल. तसे न केल्यास आयकर विभाग असे मानतो की तुम्ही कर चुकवित आहात. त्यामुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
3) डेबिट कार्ड शुल्क –
2 पेक्षा जास्त बँक खात्यांसह, सर्व डेबिट कार्डचा पिन क्रमांक आणि नेट बँकिंगसाठीचा पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण आहे. बर्याच वेळा बँका पुन्हा पिन जनरेट करण्यासाठी शुल्क आकारतात.
4) ट्रांजेक्शन न झाल्यास अकाऊंटवर येणार निर्बंध –
जर बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स शिल्लक असेल मात्र खात्यातून बराच काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर खात्यावर अनेक निर्बंध येतात. ते खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, संपूर्ण प्रक्रिया अनुसरण करणे आवश्यक आहे.
visit : Policenama.com
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ