योग्य शासन व्यवस्थेसाठी भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना वाटते की, देशात चांगल्या शासन व्यवस्थेसाठी विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. जेणेकरून सरकारवर नेहमीच दबाव राहील. जयपुर लिटरेचर फेस्टिवलच्या एका सत्रामध्ये त्यांनी सांगितले की, जेव्हा विरोधक विखुरलेला आणि कमजोर असेल तेव्हा सत्ताधारी कोणतीही गोष्ट करण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे लोकशाहीमध्ये मजबूत विरोधी पक्ष असलाच पाहिजे.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना बॅनर्जी म्हणाले, आर्थिक क्षेत्राची परिस्थीती वाईट आहे, बँकांची परिस्थीती आपण सगळे जाणतोच आणि खरे हेच आहे की सरकारकडे देखील पैसे नाहीत. उत्पादन केलेल्या वस्तूंच्या मागणीमध्ये कमतरता आहे कारण लोकांकडे पैसे नसल्यामुळे ते खर्च करत नाहीयेत.

देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दर्शवत बॅनर्जी म्हणाले की, शहरी क्षेत्रातील मंदीचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे. ते म्हणाले, आपण हे विसरू नये की ग्रामीण अर्थव्यवस्था शहरावर अवलंबून आहे जी देशात राहणाऱ्या लोकांना रोजगार देते. म्हणूनच, शहरी भागाच्या पडझडीचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडणार आहे.

अशा वेळी जेव्हा जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष अधिक सबसिडी देण्याचे आश्वासन देतात, विशेषत: निवडणुकांच्या वेळी, बॅनर्जी म्हणाले की हे गरिबांसाठी महत्वाचे आहे, परंतु तसे केले जाऊ नये. तसेच ते म्हणाले, ही सबसिडी गरज नसलेल्यांनाच दिली जाते तेव्हा परिस्थिती आणखी गोंधळाची होऊन जाते.

जेव्हा गरिबी कमी होईल तेव्हाच देशाच्या सुधारणांमध्ये बदल दिसून येईल असे देखील बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.