3 उच्चपदस्थ सरकारी नोकर्‍यांच्या ‘ऑफर’ धुडकावल्या, अखेर शेतकर्‍याचा मुलगा बनला IAS

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काहीजण असे असतात की ते कितीही मोठे झाले तरी त्यांची आपल्या मातीशी जोडलेली नाळ घट्ट असते. ते कधीच आपल्या मातीला विसरत नाहीत. ही गोष्ट आहे अशाच एका अवलियाची. शिवप्रसाद मदन नकाते असे त्यांचे नाव पेशाने ते IAS अधिकारी आहेत पण त्यांनी त्यांच्या मूळ मातीशी असलेलं नातं कधीच तुटू दिलं नाही. आजही ते आपापल्या गावी शेतात काम करायला कोणतीही तमा बाळगत नाहीत. सध्या ते राजस्थान जिल्हातील श्रीगंगानगर इथं जिल्हाधिकारी आहेत.

शिवप्रसाद हे मूळचे माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील रहिवासी. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मदन नकाते हे एक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी 10 वीपर्यंत शिक्षण घेतलं. करिअरच्या वाटा निवडत असताना त्यांना तीन ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यांचं ध्येय पक्कं झालं होतं. शिक्षणाच्या दरम्यानच त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करून सरकारी अधिकारी व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगलं आणि मोठं झाल्यावर स्वप्न हे सत्यातही उतरलं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी IAS ची परीक्षा पास केली. शिवप्रसाद यांचे वडील सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचे त्यांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत शिवप्रसाद देखील सामाजिक कार्यात सहभाग घेतात तालुक्यातील अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची ते मदत करत होते.

शैक्षणिक प्रवास खडतर मात्र जिद्द पक्की
शिवप्रसाद यांनी शिक्षण सुरू असताना एका वेळेस बीडीएस आणि दुसऱ्यांदा आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली होती. पण आयएएस अधिकारी होण्याचं शिवप्रसाद यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी बीडीएस आणि आयआयटीला प्रवेश घेतला नाही. अभ्यासादरम्यान त्यांनी मोबाइल फोन सुद्धा टाळला होता. शिवप्रसाद हे दररोज १० तास स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. २०१० मध्ये राज्य वन सेवा, महाराष्ट्र प्रशासन सेवा आणि सेंट्रल पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक पदाची परीक्षा पास करून निवड झाली. पण शिवप्रसाद यांना आयएएस अधिकारीच व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी तिन्ही मधली कोणतीही सरकारी नोकरी स्वीकारली नाही. राज्य सरकारकडून ५० विद्यार्थ्यांची बॅच तयार करण्यात आली. यात त्यांनी सेल्फ स्टडीवर लक्ष देऊन पुढची तयारी केली. २०१० मध्ये अखेर आयएएसची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं. २०११ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. सध्या ते राजस्थान जिल्हातील श्रीगंगानगर इथं जिल्हाधिकारी आहेत. याआधी ते बाडमेर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/