स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून तरूण फोटोग्राफरची आत्महत्या, नातेवाईकांचा राडा

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – मालकासोबत वाद झाला, अन्‌ त्‍या‌नंतर एका तरुण छायाचित्रकाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. यानंतर मयत छायाचित्रकाराच्या संतप्त नातेवाईकांनी मालकाच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. शुभम आलूगोंडा असे या तरूण छायाचित्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी जेबी स्टुडिओचे मालक जगदीश बारस यांच्यासह चौघांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

शुभम हा जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील जेबी फोटो स्टुडिओत छायाचित्रकार म्हणून काम करत होता. जेबी फोटो स्टुडिओत काम करत असताना शुभमने स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, यावरून जेबी स्टुडिओचे मालक जगदीश बारसे याच्याशी शुभमचा वाद झाला.

याच वादातून शुभमला मालक जगदीश बारसे धमक्या देत होते, असा आरोप शुभमच्या नातेवाईकांनी केलाय. जगदीश बारसे यांच्या धमक्यामुळेच शुभमने आत्महत्या केली आहे, असे शुभमच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या संतप्त नातेवाईकांनी जेबी स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केलीय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like