‘बेबी डॉल’ सनीचं नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला ! मात्र लुकनं वेधलं साऱ्यांचंच लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची बोल्ड अँड ब्यूटिफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) गेल्या काही दिवसांपासून आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत आहे. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला होता. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. परंतु यावेळी तिच्या चर्चेचा विषय हा हॉटनेस नाही तर काही औरच आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती ऑरेंज कलरचे केस आणि ब्राईट पिंक लिपिस्टिक आणि लाईट मेकअपमध्ये दिसत आहे. याशिवाय तिनं निऑन कलरचं जॅकेटही घातलं आहे. चाहतेही सनी असा अवतार पाहून अवाक् झाले आहेत.

सनीचा हा लुक पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडले होते. परंतु सनीनं सर्वांच्या शंकाचं निरसण केलं आहे. हे फोटो तिच्या अपकमिंग साँगमधील फोटोशूटचे आहेत असं तिनं सांगितलं आहे. सनीच्या आगामी गाण्यात आता तिचा हा लुक पाहायला मिळणार आहे.

सध्या सनीचे हे फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. चाहत्यांनाही सनीचा लुक खूप आवडला आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी, हेलेन आणि कोटीगोब्बा 3 अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. हे सर्व सिनेमे साऊथ इंडस्ट्रीतील आहेत असं समजत आहे. याशिवाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.

https://www.instagram.com/p/CG-IJK_gpB8/

https://www.instagram.com/p/CFb9H4OAyzA/

https://www.instagram.com/p/CFb9BbiA__6/

https://www.instagram.com/p/CDkcs6RlLcX/

https://www.instagram.com/p/CDkcoa_lf6P/

https://www.instagram.com/p/CDkci2HFG_v/

https://www.instagram.com/p/CDdu40lFYj1/

https://www.instagram.com/p/CDduvexlTt-/

https://www.instagram.com/p/CDKpxcol-oT/

https://www.instagram.com/p/CDHEt9_FHJT/