‘बिग बी-नागराज मंजुळे’ यांच्या झुंड सिनेमावर सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ! जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नागराज मंजुळे (Nagraj Manjule) डायरेक्टेड आणि बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनित झुंड (Jhund) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु हा सिनेमा रिलीज हाेण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आधी तेलंगणा उच्च न्यायालयानं या सिनेमावर बंदी घातली होती. आता सर्वोच्च न्यायालयानं या बंदीला मान्यता दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नंदी चिन्नी कुमार (Nandi Chinni Kumar) नावाच्या एका व्यक्तीनं या सिनेमावर कॉपीराइट्सचा दावा ठोकला होता. झुंड सिनेमाची कथा ही त्या व्यक्तीच्या कथेची नक्कल आहे असं त्याचं म्हणणं आहे. परंतु झुंड सिनेमाच्या निर्मात्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयानं मात्र बिग बींच्या सिनेमावर बंदी घातली. यानंतर या बंदीविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण जस्टीस बोबडे, केएस बोपन्ना आणि व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या निरीक्षणाखाली कोर्टात सुरू होतं. परंतु या सिनेमाला दिलासा मिळाला नाही. त्यांनीही तेलंगणा उच्च न्यायालयाच्या बंदीला मान्यता दिली.

नागराज यांचा झुंड सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शूटिंग झाली आहे. हा एक हिंदी सिनेमा आहे.