मराठी माणसाला ‘सुप्रीम’ पद ! ‘सरन्यायाधीश’पदी शरद बोबडे विराजमान, CJI चा घेतला ‘पदभार’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून सकाळी साडेनऊ वाजता शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बोबडे यांचा कार्यकाळ सुमारे 17 महिने असेल, ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील.

अयोध्या निकालप्रक्रियेमध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे यांची महत्त्वाची भूमिका होती. ऑगस्ट 2017 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश जेएस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील नऊ-सदस्यीय घटनापीठाचे सदस्य असलेले न्यायमूर्ती बोबडे यांनी गोपनीयतेच्या अधिकाराला मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले होते.
नुकत्याच त्यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यांच्या खंडपीठाने माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक समितीत निवडलेल्या सदस्यांचा पदभार मागे घेण्यास व बीसीसीआयच्या कारभारावर देखरेख करण्याचे निर्देश दिले.

मुख्य न्यायाधीश बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील अरविंद बोबडे हे ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. नागपूर विद्यापीठातून कला व विधी विषयात त्यांनी पदवी संपादन केली. 1978 मध्ये त्यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 21 वर्षे काम केल्यानंतर ते मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि त्यानंतर 12 एप्रिल 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

Visit : Policenama.com