भाजपाला ‘सुप्रीम’ झटका ! 24 तासात ‘बहुमत’ चाचणी करा : सुप्रीम कोर्ट

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर रविवार आणि सोमवार या दोन दिवशी सलग सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सकाळी साडेदहा वाजता सुनावणीस सुरवात झाली. न्यायमुर्ती एनव्ही रामण्णा, न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि न्यायमुर्ती अशोक भूषण यांनी आज (मंगळवारी) शेवटी 24 तासात ‘बहुमत’ चाचणी व्हावी, हंगामी अध्यक्ष नेमा हा निर्णय दिला आहे.

राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याच दिवशी सायंकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका दाखल करून घेतली. रविवारी आणि सोमवारी दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. शिवसेनेकडून कपिल सिब्बल, राष्ट्रवादीकडून अभिषेक मनु सिंघवी, भाजपाकडून मुकूल रोहतगी, सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अजित पवार यांच्याकडून मनिंदरसिंग यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात बाजु मांडली होती. सुप्रीम कोर्टाने सर्वांचे म्हणणे ऐकुन घेतले आणि याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता ठेवली.

आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं. –

* सकाळी 10.25 वाजता शिवसेनेचे वकिल कपिल सिब्बल, राष्ट्रवादीचे वकिल अभिषेक मनु सिंघवी, भाजपाचे वकिल मुकूल रोहतगी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, अजित पवारांचे वकिल मनिंदर सिंग, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, वेणूगोपाल, मुकूल वासनिक, रणदीप सुरजेवाला शिवसेनेचे गजानन किर्तीकर हे कोर्टरूममध्ये पोहचले. इतर वकिल आणि राजकीय नेते कोर्ट रूममध्ये येण्यास सुरवात.

* सकाळी 10.30 वाजता तिन्ही न्यायमुर्ती कोर्टरूममधील बेंचवर आले. कामकाजाला सुरूवात सुरू.

* कोर्टरूममध्ये उत्सुकता. निकाल ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर देखील गर्दी

* न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा यांनी निकाल वाचणास सुरवात केली.

* कोर्ट आणि विधिमंडळ यांच्या अधिकारावर खुप सविस्तर चर्चा झाली : न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा
* लोकतांत्रिक मुल्यांचं संरक्षण होण्याची गरज, नागरिकांना चांगलं सरकार गरजेचं : न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा
* देण्यात येणारी ऑर्डर अंतरिम आहे : न्यायमुर्ती एनव्ही रमण्णा

* उत्तराखंड, मुंबई आणि जगदंबिका पाल केस या सगळया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आधार घेतलेला आहे : रमण्णा

* आज (मंगळवार) आमदारांचा शपथविधी व्हावा : न्यायमुर्ती रमण्णा

* उद्या (बुधवार) फ्लोअर टेस्ट व्हावी, गुप्त मतदान नको, संपुर्ण मतदानाचं लाईव्ह चित्रीकरण : न्यायमुर्ती रमण्णा
* हंगामी अध्यक्ष नेमा : सुप्रीम कोर्ट

 

Visit : Policenama.com