गोध्रा बिद्रा सब उधर, यहा तुम्हारी दादागिरी चलने नही दूंगी : सुप्रिया सुळे

एकाने गुजरात अण एकाने नागपूर पाहावे ; सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना इशारा

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – बारामती विभाग आमचा आहे, येथील जनताही आमची आहे, तुम्ही दोघे बाहेरचे आहात एकाने नागपूर बघावं आणि एकाने गांधीनगर बघावे हा भाग आमचा आहे. तुमची दादागिरी येथे चालू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना दिला.

दौंड तालुक्यातील गावभेट दौऱ्या दरम्यान त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी गोध्रा बिद्रा सब उधर, वो सब यहा नही आने दूंगी असे म्हणत गोध्रा कुणी केला हे सर्वांना माहीत असून सर्वात जास्त क्राईम मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये आहे याकडे लक्ष वेधले.