लोकसभा २०१९ : सुप्रिया सुळे नक्की हरणार ‘या’ मंत्र्याचे भाकीत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांच्या प्रचारसभा आणि रॅलींना वेग आला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपकडुन कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. अशातच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक निकालाबाबत एक नवे भाकीत केले आहे. ‘सुप्रिया सुळे नक्की पराभूत होणार’ असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सांगली येथे ते एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

राष्ट्रवादिच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यावेळी निवडणुकीत नक्की पराभूत होणार, मात्र प्रचारासाठी १५ दिवस बाकी असल्यामुळे त्या किती मतांच्या फरकाने हरणार हे अजून स्पष्ट व्हायचंय असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

… तर कायमची कीड निघून जाईल

तसेच पुण्यात रविवारी खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली, ” एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात यावेळी बोलताना शिवतारे यांनी केला” या कार्यक्रमाला देखील चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली होती.

संजय काकडेंचे भाकीत

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख संजय काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होणार असे भाकीत संजय काकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले होते. याची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.