Video : फोटोसाठी सोंडेवर बसलेल्या महिलेला हत्तीनं केलं ‘असं’ काही, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फोटो काढण्यासाठी वेगळा प्रयोग करताना अनेकांना किंमतही मोजावी लागते. सध्या असाच एका फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोशूटचा हटके प्रयोग त्या महिलेच्या जिवावर बेतला म्हटले तर वावगे ठरणार नाही. फोटोसाठी सोंडेवर बसलेल्या महिलेला हत्तीने अद्दल शिकविली आहे.

वन अधिकारी सुशांत नंदा यांनी या महिलेच्या फोटोशूटचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत एक महिला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटोशूट करत आहे. पण या महिलेला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटो काढण्याचा शौक चांगलाच महागात पडला. कारण हत्तीने महिलेला अगदी फुटबॉलसारखे फेकून दिले आहे. त्या महिलेचे नशीब चांगले होते की हत्तीने महिलेला पाण्यात फेकले. नाहीतर त्या महिलाचा जीव गेला असता.

या व्हिडीओमध्ये सगळ्यात सुंदर काय आहे महिला, हत्ती की घडलेला प्रसंग? असे कॅप्शन नंंदा यांनी दिले आहे. या व्हिडीओला नेटकर्‍यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या मजेशीर फोटोशूटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.