जैदपासून कैझानपर्यंत, ‘ते’ 5 ड्रग पॅडलर ज्यांच्याशी रियाच्या भावाचे ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल सर्वात मोठा मुद्दा झाला आहे. जे प्रकरण अगोदर फक्त नेपोटीज्म भोवती फिरताना दिसत होते, आता सर्व समीकरणे बदलली आहेत. सध्या सुशांतपेक्षा जास्त चर्चा तर रियाचा भाऊ शोविक आणि त्याच्या ड्रग्ज कनेक्शनची होत आहे. सुशांत प्रकरणात एनसीबीची एंट्री झाल्यापासून अनेक ड्रग पॅडलरला अटक झाली आहे. हे सर्व ड्रग पॅडलर कोणत्या ना कोणत्या प्रकारे शोविकशी संबंधित आहेत. या कारणास्तवच शोविकला शुक्रवारी एनसीबीच्या ताब्यात घेण्यात आले.

तसे तर एनसीबीने तपासादरम्यान अनेक ड्रग पॅडलर्सची चौकशी केली आहे. यात जैद, कैझान, बसित, अब्बास आणि करण यांचा समावेश आहे. हे सर्वजण एनसीबीच्या रडारवर आहेत आणि शोविकशी त्यांचा काहीतरी संबंध आहे. जैद बर्‍याच काळापासून ड्रग्सच्या जगात सक्रिय आहे. जैदला एनसीबीने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती. जैदने चौकशी दरम्यान सांगितले होते की, तो बसित व सूर्यदीपच्या सतत संपर्कात होता. हे दोघेही शोविकला चांगले ओळखत होते. जैदच शोविकला ड्रग्ज देत असे आणि सॅम्युएलकडून त्या ड्रगसाठी पैसे दिले जात असत.

कैझान इब्राहिम हे देखील सुशांत प्रकरणात एक मोठे नाव समोर आले आहे. त्याचेही शोविकची संबंध होते. एनसीबीने ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती. कैझानही बसित आणि सूर्यदीप यांना ओळखत होता. चौकशीदरम्यान बसितनेच कैझानचाही उल्लेख केला होता आणि त्याने सांगितले होते की, ड्रग्सच्या या धंद्यात त्याचाही सहभाग आहे. एनसीबीने कैझानचा मोबाइल फोन जप्त केला आहे. कैझान हा एक ब्रोकर आहे. बसित परिहार या नावाचा उल्लेखही बर्‍याच वेळा केला गेला आहे. बसित हा शोविकचा एक चांगला मित्र असल्याचे म्हटले जात आहे. वांद्रेच्या फुटबॉल क्लबमध्ये या दोघांची मैत्री झाली होती. असे म्हटले जात आहे की, जैदसह मिळून बसित माफिया सोहेलकडून ड्रग्ज घेत असे आणि नंतर ग्राहकांना पुरवत असे.

तसेच एनसीबीने ऑगस्ट महिन्यात अब्बास आणि करण अरोरालाही मुंबईहून अटक केली होती. त्या दोघांकडून बड आणि मारिजुआना सापडले होते. वृत्तानुसार, या अटकेमुळेच एनसीबी जैद आणि बसितपर्यंत पोहोचू शकले होते. काही काळानंतर अब्बास आणि करण यांना बेल मिळाली होती. या प्रकरणात अनेकदा गौरव आर्याचाही उल्लेख केला गेला आहे. असे अनेक चॅट व्हायरल झाले आहेत, ज्यात गौरवचे रिया आणि शोविकशी संबंध समोर आले आहेत. सुशांत प्रकरणात जेव्हा ड्रग अँगल समोर आला, तेव्हापासून गौरव आर्या सतत चर्चेचे केंद्र राहिला आहे. ३१ ऑगस्ट रोजी ईडीने गौरवची अनेक तास चौकशी केली होती. त्याने सांगितले होते की, रियाला २०१७ मध्ये तो गोव्यात भेटला होता. गौरवने सांगितले होते की, काही वेळा रियाने त्याच्याशी ड्रग्जविषयी चर्चा केली होती. गौरवची पोहोच खूप वर सांगितली जात आहे. त्याचे बॉलीवूड सर्किटशी चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे.