संदीप सिंहच्या दाव्यांचा पर्दाफाश ! सुशांतच्या मृत्यूनंतर स्वत:ला सांगितले होते निकटर्वीय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत केसमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सुशांतला आपला जवळचा मित्र असल्याचे सांगणारा फिल्ममेकर संदीप सिंहची कॉल डिटेल्स समोर आली आहे. ज्यातून मोठा खुलासा झाला आहे की, मागील एक वर्षात संदीप सिंह आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये एकदाही बोलणे झालेले नाही. सुशांतच्या कुटुंबियांनीही संदीप सिंहवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

संदीप सिंहबाबत मोठा खुलासा
सुशातचे कुटुंबिय अगोदरपासूनच दावा करत आले आले आहेत की, ते संदीप सिंहला ओळखत नाही. संदीप सुशांतचा निकटवर्तीय आहे, हेदेखील त्यांना माहित नव्हते. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर संदीप सिंह फ्रंटवर काम करताना दिसत होता. हॉस्पीटलपासून स्मशानापर्यंत संदीप सिंह सर्वात पुढे दिसत होता. कुपर हॉस्पीटलमध्ये सर्व काम संदीप सिंहच्या देखरेखीत झाले होते. सुशांतच्या बहिणीसोबत सुद्धा संदीप सिहं दिसला होता.

अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर सोबत संदीप 4 वेळा बोलला
दुसरीकडे, हेदेखील समजले की संदीप सिंहने अ‍ॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला कॉल केला होता. संदीपने 14 जूनला 3 वेळा आणि 16 जूनला एकदा ड्रायव्हरला कॉल केला होता. एकुण संदीप आणि अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरमध्ये 4 वेळा बातचीत झाली होती. अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला जेव्हा विचारले गेले तेव्हा त्याने बोलण्यास नकार दिला.

परंतु, आता ज्याप्रकारे संदीप सिंहबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते पहाता प्रश्न विचारण्यात येत आहे की, संदीप सिंहला हॉस्पीटलमध्ये कुणी पाठवले होते का? कारण सुशांतसोबत मागील एक वर्षात त्याची कोणतीही चर्चा झाली नव्हती, मग का तो पुढे येऊन सर्व लीड करत होता. संदीप सिंहच्या दुबई कनेक्शनची सुद्धा बाब समोर आली आहे.

सुशांतच्या मृत्यूवर काय म्हणाला होता संदीप?
आज तकला प्रतिक्रिया देताना संदीप म्हणाला होता, जेव्हा सुशांतच्या मृत्यूबाबत समजले तेव्हा शॉक्ड होतो. 10 मिनिटे काही समजलेच नाही. नीतू दीदी आणि बाकी लोक काही बोलू शकत नव्हते. घरी केवळ एक मॅनेजर आणि तीन किंवा चार नोकर होते. सर्वजण धक्कयात होते आणि रडत होते. पोलीस आपले काम चांगल्या प्रकारे करत होते. नीतू दीदी तर खुपच ब्लँक होती. तिला विश्वासच बसत नव्हता की आपल्या गुलशनने असे काही केले आहे. सुशांत एक आनंदी मुलगा होता. त्याला स्वतावर खुप कॉन्फिडन्स होता. त्याला माहित होते की त्याला काय करायचे आहे. काय योग्य आणि काय चूक हे त्याला चांगले समजत होते.