Sushant Singh Rajput Death Case | ‘सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी नवे पुरावे सापडले’, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sushant Singh Rajput Death Case | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला तीन वर्ष होऊन गेली. मात्र, अद्याप त्याच्या आत्महत्येचा (Suicide) तापासातून ठोस कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली होती. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर (Sushant Singh Rajput Death Case) मोठे भाष्य केलं आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतने आत्महत्याच केल्याचे समोर आले, मात्र त्याची हत्या (Murder) झाल्याचे चाहते आणि कुटुंबिय वारंवार सांगत आहेत. हे प्रकरण (Sushant Singh Rajput Death Case) इतकं पेटलं की योग्य तपासासाठी ते सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आले. मात्र, आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल (Charge Sheet) केलेले नाही. आता एका मुलाखीत या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवीन खुलासे केले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्वी उपलब्ध माहिती ही केवळ अफवांवर आधारित होती, त्यानंतर काही लोकांनी दावा केला की त्यांच्याकडे या प्रकरणासंबंधीचे पुरावे आहेत. त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधून पुरावे पोलिसांकडे (Mumbai Police) देण्यास सांगितले. सध्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता पडताळण्याचे काम सुरु असून अद्याप तपास सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे खटल्याच्या निकालावर भाष्य करणे त्यांच्यासाठी खूप घाईचे आहे.

रिया चक्रवर्तीवर होते आरोप

सुशांतच्या मृत्यूवेळी तो रिया चक्रवर्तीसोबत (Rhea Chakraborty) रिलेशनशिपमध्ये होता आणि नंतर या प्रकरणी तिच्यावर आरोप झाले. अमली पदार्थ घेणे आणि खरेदी केल्याप्रकरणी तिला जवळपास महिनाभर जेलची हवा खावी लागली होती. मात्र, न्यायालयाने नंतर मान्य केले की एनसीबीकडे (NCB) या आरोपांसंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत. यानंतर तिची सुटका करण्यात आली.

दिशा सालियनचा मृत्यूने वेगळे वळण

सुशांत सिंह राजपूत याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सुशांत हा विषय नेहमी ट्रेंडिंग मध्ये असल्याचे दिसून आले. त्याचे चाहते त्याला न्याय कधी मिळणार असा प्रश्न विचारत असतात. या सगळ्यात सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिने देखील आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

Web Title :  Sushant Singh Rajput Death Case | devendra-fadnavis-gives-new-update In Sushant Singh Rajput Death Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा