कसा बॉलीवुडनं सुशांत सिंहवर घातला होता ‘बहिष्कार’, समोर आले ‘वेदना’दायी जुने ट्विट

मुंबई : बॉलीवुड सुपर स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सुसाईड केसमध्ये बॉलीवुडच्या दिग्गजांची चौकशी पोलीस करत आहेत. सुशांतच्या फॅन्सचे म्हणणे आहे की, त्याला सुसाईड करण्यास भाग पाडले होते. याचे प्रमुख कारण इंडस्ट्रीमधील भाई-भतीजावाद आहे. याशिवाय, बॉलीवुडमध्ये प्रत्येकजण त्याच्यावर बहिष्कार टाकत होता. लोकांचे म्हणणे आहे की, जर बॉलीवुडमध्ये कुणी प्रभावशाली व्यक्ती कुणाचा बहिष्कार करत असेल, तर कुणीही त्या व्यक्तीशी बोलत नाही. त्याला एकटा पाडतात.

2016 चे जुने ट्विट झाले वायरल
सुशांतच्या फॅन्सने त्याचे एक जुने ट्विट शोधून काढले आहे. जे सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. या ट्विटमध्ये तो स्वत: स्वीकार करत आहे की, त्याला बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जात नाही. हे ट्विट 2016 चे आहे. ज्यामध्ये एक फॅन सुशांतला सतत बॉलीवुड पार्टी अ‍ॅटेंड करण्याची रिक्वेस्ट करत होता. जी एका विशेष रात्री होत होती. सुशांत नेहमी आपल्या फॅन्सला उत्तर देत असे. त्यांच्यासोबत नेहमी चर्चा करत असे. त्या दिवशीसुद्धा त्याने पार्टीत का जात नाही ते सांगितले.
बॉलीवुड पार्टियों में नहीं किया जाता था इनवाइट

पार्ट्यांमध्ये केले जात नव्हते आमंत्रित
सुशांत सिंह राजपूतचा एक फॅन ट्विट करून आग्रह करत होता की, भाई प्लीज आज रात्री होत असलेल्या तिनपैकी एका कोणत्याही एका पार्टीत सहभागी हो…बस…प्लीज. सुशांत त्यास रिप्लाय करताना लिहितो की, मला या तीन बॉलिवुड पार्टीपैकी कुणीही आमंत्रित केलेले नाही, यासाठी स्वीटहार्ट, मी या पार्टीत जाऊ शकत नाही. परंतु, मी पिंक पहात चांगला वेळ घालवत आहे. या ट्विटमध्ये सुशांतने शेवटी एक स्मायली अ‍ॅड केली आहे.

बॉलिवुडमध्ये त्याच्याकडे दुर्लक्षित केले
त्याच्या या ट्विटवरूव अंदाज येतो की, बॉलीवुडमध्ये त्याला कशाप्रकारे दुर्लक्षित केले जात होते, जे वेदनादायी होते. सुसाईडपूर्वी बॉलीवुडने त्याच्यासोबत कसा व्यवहार केला, याचा हा पुरावा आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवुडचे अनेक दिग्गज आता संशयाच्या भोवर्‍यात आहेत. तर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या सुसाईडला मर्डर म्हटले आहे.

भाजपा खासदाराने मृत्यूवर उपस्थित केला प्रश्न
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक डॉक्यूमेंट शेयर केले आहे, त्यामध्ये सुशांतशी संबंधीत एकुण 26 पॉईंट सांगितले आहेत. ज्यापैकी केवळ दोन आत्महत्येच्या थेअरीला सपोर्ट करतात, याशिवाय सर्व 24 पॉईंटचा इशारा खूनाकडे आहे. त्यांनी सुशांतच्या गळ्यावर आढळलेल्या निशाणीबाबत म्हटले आहे की, सुशांतच्या गळ्यावर आढळलेले व्रण आत्महत्येकडे इशारा करत नाहीत. तसेच अँटी-डिप्रेसेंट ड्रग्स आढळणे, डोळे बाहेर न येणे, तोंडातून फेस न येणे, जीभ बाहेर न येणे असे अनेक पूरावे सादर केले आहेत.

गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप
दुसरीकडे सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये प्रेमात फसवूण आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी रिया चक्रवर्तीसह सहा लोकांना आरोपी बनवले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी हा देखील आरोप केला आहे की, सुशांतच्या खात्यातून सुमारे 15 कोटी रूपये काढण्यात आले. ते अशा खात्यात ट्रान्सफर झाले आहेत, ज्याचा सुशांतशी काहीही संबंध नव्हता. आपल्या 7 मागण्यांमध्ये के. के. सिंह यांची हीसुद्धा एक मागणी आहे की, हे पैसे कोणत्या खात्यांमध्ये गेले याचा तपास करावा, या बँक खात्यातून, क्रेडिट कार्डमूधन किती पैसे रियाने आपल्या कुटुंबियांना आणि सहकार्‍यांना दिले आहेत.