चिन्मयानंद रेप केस : काँग्रेसच्या ‘न्याय यात्रे’ला परवानगी नाकारली (व्हिडीओ)

शहाजहांपूर : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंदवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीलाच अटक केल्याप्रकरणी काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहाजहांपूर ते लखनऊ अशी ‘न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. परंतु, पोलिसांनी या न्याय यात्रेला परवानगी नाकारली आहे.

काँग्रेस पक्षाचे उपनेते आराधना मिश्रा यांनी सांगितले की, भाजपा सरकार बलात्कार करणाऱ्या चिन्मयानंद यांना मदत करीत आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीलाच अटक करुन चिन्मयानंद यांची केस कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या पिडित तरुणीला न्याय देण्यासाठी सोमवारी शहाजहांपूर ते लखनऊ अशी १८० किमीची न्याय पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यात उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव याही यात्रेत सहभागी होणार आहे. मात्र, पोलिसांनी या यात्रेला आता परवानगी नाकारली आहे.

त्यामुळे यात्रा काढायची की नाही याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. चिन्मयानंद आणि पिडित तरुणीच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Visit : policenama.com