दहशतवाद्यांचा खात्मा करा ! ‘या’ बड्या राष्ट्राचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतले. त्यानंतर दाबावाखाली असलेल्या पाकिस्तानेचे अमेरिकेने कान टोचले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी, असं पाकिस्तानला सुनावले. मात्र पाकिस्ताने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केल्यास अमेरिका भारताला पाठिंबा देईल, असं अमेरिकेनं सांगितलं आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात संवाद झाला, अशी माहिती मिळाली आहे. यात अमेरिकेने भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असं अमेरिकेन सांगितलं आहे. तर भारताने केलेल्या कारवाईचे अमेरिकेन समर्थन केले आहे.

दरम्यान, दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने लष्करी कारवाई टाळावी आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी, असेही अमेरिकेने सांगितलं आहे.