‘त्या’ व्हिडिओवरून शिवसेना उपनेत्यावर कारवाई करा

दलित कार्यकर्त्यांची एसपी कार्यालयासमोर निदर्शने

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दलित कार्यकर्त्याला खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचा चिथावणी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापराची धमकी देणाऱ्या राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना देऊन एसपी कार्यालयासमोर आज दुपारी निदर्शने केली.

महापालिकेच्या शहर अभिनेत्यावर बूट फेकून मारण्याच्या घटनेवेळीॆचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राठोड हे एका दलित कार्यकर्त्याला खोटा ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची चिथावणी देत होते. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याची चिथावणी देणाऱ्या शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी..त्यांच्याविरोधात कडक कारवाई केल्यास भविष्यात कोणी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणार नाही, असे निवेदन दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

यावेळी निलेश बांगरे, सुरेश बनसोडे, सिद्धार्थ आढाव, मयूर बांगरे, नरेंद्र भिंगारदिवे अादी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर ‘व्हिडिओ’वरून राठोड हे चांगलेच ट्रोल झाले आहेत. तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राठोड यांच्याविरुद्ध दलित कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावर पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.