सत्तास्थापनेबाबत उध्दव ठाकरे – शरद पवार – काँग्रेस नेते यांच्यात फोनवरून बोलणी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाशिव आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन बोलणी झाली असून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी औपचारिक विनंती केल्याचे समजते. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळणार?, याविषयी आता चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे राज्यपालांना शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या पत्रावर आमदारांच्या सह्या घेण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज सकाळी होत आहे. राज्यात महा शिव आघाडी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाले असून आता काँग्रेसही सरकारमध्ये येते की, बाहेरुन पाठिंबा देते, याचा निर्णय दिल्लीतील बैठकीत होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कोण कोण असेल व कोणाला किती व कोणती पदे द्यायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com