खुशखबर ! पुन्हा स्वस्त झाला ‘या’ नामांकित कंपनीचा ‘सेट-टॉप’ बॉक्स, जाणून घ्या नवीन किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या सहा महिन्यात टाटा स्काय ने चार वेळा आपल्या सेटटॉप बॉक्सच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. यावेळी देखील कंपनीने सेटटॉप बॉक्सची किंमत कमी केली आहे. या आधी एप्रिल 2019 मध्ये ट्राय ने जेव्हा पहिल्यांदा दरामध्ये कपात केली त्यावेळी कंपनीने देखील आपल्या बॉक्सचे दर बदलायला सुरुवात केली होती. आता कंपनीने एक स्पेशल ऑफर सुरु केली आहे ज्यानुसार 1399 रुपयांमध्ये सेटटॉप दिला जाणार आहे.

टाटा स्काय कंपनी सर्वात मोठी डीटीएच प्रोव्हायडर कंपनी बनली आहे त्यामुळे कंपनीने आपल्या ग्राहकांच्या संख्येत अधिक वाढ होण्यासाठी नवीन कस्टमरला ऑफर देत आहे.

काही दिवसांपूर्वीच टाटा स्कायने आपली नवीन सेवा टाटा स्काय बिंज + भारतात सादर केली आहे. टाटा स्काय बिंज + एक अँड्रॉइड सेटटॉप बॉक्स आहे. टाटा स्काय बिन्झ प्लसमध्ये अँड्रॉइड सपोर्ट असल्यामुळे ग्राहकांना या सेटटॉप बॉक्सद्वारे सॅटेलाईट चॅनेल, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारखे चॅनेल पाहण्याची संधी मिळणार आहे.

टाटा स्काय बिंज + कंपनीच्या www.tatasky.com या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. याची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. याची स्पर्धा एयरटेल एक्सट्रीम बॉक्स सोबत आहे ज्याची किंमत 3,999 रुपये आहे.

याव्यतिरिक्त यासोबत ZEE5 आणि SunNXT सारखे अँप देखील मिळणार आहेत. नव्या ग्राहकांना बिंज ची सेवा एक महिन्यासाठी फ्री मध्ये दिली जात आहे ज्याची किंमत 249 रुपये आहे. त्याचप्रमाणे यासोबत टाटा स्काय बिंज नुसार ग्राहकांना हॉटस्टार, झी 5 चे सबस्क्रिप्शन फ्री मध्ये दिले जाणार आहे.

You might also like