कौतुकास्पद ! गर्भवती महिलेला नरकात जाण्यापासून वाचवलं ‘या’ ट्रॅक्सी चालकानं, सर्वत्र कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – ब्रिटनमध्ये एक माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका गर्भवती महिलेला वेश्याव्यवसायात जाण्यापासून एका टॅक्सी ड्रायव्हरने वाचवल्याने त्याचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. यामुळे ब्रिटनमधील पोलीस या ड्रायव्हरचा अधिकृतरीत्या जाहीर सत्कार करणार आहे. ताहिर महमूद असे या टॅक्सी ड्रायव्हरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर गर्भवती महिलेला त्याला वेश्यालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती मसाज काम करण्यासाठी आली होती. मात्र तिला जबरदस्ती वेश्याव्यसायात ढकलण्यात आले. हि महिला रोमानियाची रहिवासी असून तिला ब्रिटनमध्ये बंधक बनवण्यात आले होते. पोलिसांनी या महिलेला फेब्रुवारी 2018 मध्ये रेस्क्यू केले होते. मात्र यामधील टॅक्सी ड्रायव्हरची आता सांगण्यात आली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील पोलिसांनी जारी केला असून यामध्ये कशाप्रकारे महिलेला वाचवले, याचा हा संपूर्ण व्हिडीओ आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी रॉबर्ट एनेस्कू या आरोपीला अटक केली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. आता त्याला न्यायालयाने त्याच्या अनुपस्थितीत 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like