12 वी च्या विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविणारा इंजिनिअर शिक्षक गोत्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता १२ वी च्या विद्यार्थीनीच्या घरी जाऊन फिजिक्स विषयाचा क्लास घेणाऱ्या इंजिनिअर शिक्षकाने तिच्याची सुरवातीला जवळीक साधली. त्यानंतर त्यानं थेट तिला लग्नाची मागणी घातली. शिक्षकाचा उद्योग विद्यार्थीनीने घरच्यांना सांगितल्यानंतर पालकांनी इंजिनिअर शिक्षकाकडून चालू असलेल्या क्लास बंद केला. त्यानंतर शिक्षकाने चक्क विद्यार्थीनीच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठविण्यास सुरवात केली.

शिक्षकाकडून वेळावेळी फोनकरूून त्रास देणे चालू होते. होणाऱ्या प्रकाराला वैतागुन विद्यार्थीनीने पालकांसह विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गाठले. रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोबाईलनंबर वरून अधिक माहिती काढली असता शिक्षक महाशय धानोरीच्या जकात नाका परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जाऊन शिक्षक संदीप कुमार (३५, रा. पोरवाल रस्ता, लोहगाव, मुळ रा. बिहार) याला अटक केली.

संदीप कुमारच्या विरूध्द आयटी कायद्यान्वये तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पिडीत विद्यार्थीनी ही बीसीएचे शिक्षण घेत असून दोन वर्षापुर्वी ती बारावीला असताना संदीप कुमार हा तिचा फिजिक्सचा क्लास घेत होता. प्रकरणाचा अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like