Teacher’s Day ! गुरू – शिष्याच्या परंपरेवर ‘हे’ 4 कलंक, उध्वस्त केली नाती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिक्षक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पडत असतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवल्यास तो त्या शिक्षकांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. आपल्या समाजात गुरूला देवाचे स्थान दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या पवित्र नात्याला काळिमा फासण्याच्या देखील घटना घडताना दिसून येत आहे. अशाच काही घटनांची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम झाले आहे.

नग्नाव्यस्थेत करत व्हिडीओ कॉल
नुकताच पंजाबमधील जालंधरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक मुलगा एका महिलेला व्हिडीओ कॉल करताना दिसून येत आहे. यामध्ये महिला बाथरूममध्ये या मुलाबरोबर नग्नाव्यस्थेत व्हिडीओ कॉलवर बोलत असे. या व्हिडिओमधील महिला हि एका शाळेत शिक्षिका असून यातील मुलगा हा विद्यार्थी आहे. मात्र या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघानांही शाळेतून काढून टाकण्यात आले असून त्यांच्या या हरकतींमुळेच त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

विद्यार्थ्याबरोबर अवैध संबंध :पतीचा खून
यावर्षीच्या सुरुवातीला देखील अशीच एका घटना समोर आली होती. हरियाणातील पानिपतमध्ये एका 30 वर्षीय महिला शिक्षिकेचे आपल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याबरोबर अवैध संबंध होते. त्यामुळे त्यांनी या संबंधासाठी शिक्षिकेच्या पतीचा खून देखील केला. अमिता ते त्या 30 वर्षीय शिक्षिकेचे नाव होते. मात्र या संबंधामध्ये येणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच दलबीर सिंह याला त्यांनी काटा समजूनत्याचा खून केला. चार वर्षांपूर्वी तिचे लग्न त्याच्याबरोबर झाले होते. मात्र तिच्या पतीच्या विरोधाने तिने आपल्या या प्रेमींबरोबर मिळून डोक्यात घाव घालून त्याचा खून केला.

जबरदस्ती ठेवत असे संबंध
हि घटना चंदीगडमधील असून येथील एका 33 वर्षीय शिक्षिकेवर देखील आपल्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. 10 शिकणाऱ्या या मुलाशी हि महिला शिक्षिका जबरदस्ती संबंध बनवत असे. हा मुलगा तिच्याकडे क्लाससाठी जात असे. मात्र त्यानंतर दहावीत नापास झाल्यानंतर त्या मुलाच्या पालकांनी त्याचा क्लास बदलण्याचा विचार केला. मात्र या शिक्षिकेने त्यांना तसे करण्यास विरोध केला नई मुलाला खोलीत बंद करून ठेवले. मात्र त्यानंतर मुलाला सोडवल्यानंतर त्याने संपूर्ण हकीगत सांगितली. त्यावरून पालकांनी तिची पोलिसांत तक्रार केली आणि तिला अटक करण्यात आली.

मुलाला घेऊन प्रेमी शिक्षिका फरार
हरियाणाच्या फतेहाबादमध्ये मागील काही दिवसांपूर्वी घडलेली हि घटना देखील याचा प्रकारात येते. याठिकाणी महिला शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन प्रेमी विद्यार्थ्याला घेऊन पलायन केले होते. त्यानंतर तिच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 वर्षीय हि महिला शिक्षिका आपल्या 15 वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली होती. त्यांनतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक घटनांमुळे आपल्या समाजात गुरु आणि शिष्याचे नाते मोठ्या प्रमाणात बदनाम होत आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like