‘कोरोना’ काळात हात धुण्यासह सतत ‘पासवर्ड’ बदलण्याचीही करून घ्या सवय, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाच्या सवयी बदलल्या आहेत. लोकांनी यापासून वाचण्यासाठी सतत हात धुण्याची सवय लावून घेतली आहे. सोबतच आपल्या सुरक्षेसाठी इम्युनिटी सुद्धा वाढवण्यास सुरूवात केली आहे. मास्क लावल्याशिवाय लोक घराच्या पडत नाहीत. ज्याप्रकारे तुम्ही कोरोनापासून वाचण्यासाठी अशा सवयी फॉलो करत आहात, अगदी त्याचप्रमाणे या नव्या जगात पासवर्ड बदलण्याची सुद्धा सवय लावून घ्या. अन्यथा सायबर गुन्हेगारी आणि हॅकिंगसारख्या महामारीला तुम्ही बळी पडू शकता.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील लोक नाईलाजाने घरात राहात आहेत. ऑफिसची कामे घरातून केली जात आहेत. डिजिटल ट्रांजक्शन आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. अशावेळी डार्क वेब हॅकर्स युजर्सची एखादी छोटी चूक होतेय का, यावर लक्ष ठेवून आहेत. लॉकडाऊन आणि महामारीमुळे लोक आपली बहुतांश कामे ऑनलाईन करत आहेत. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन क्लास, ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. हॅकर्ससाठी स्मार्ट टीव्हीने सध्या सायबर गुन्हेगारांचे काम आणखी सोपे केले आहे.

स्मार्ट टीव्हीद्वारे सुद्धा होऊ शकते हॅकिंग

स्मार्ट टीव्हीद्वारे आजकल हॅकर्स युजर्सवर अटॅक करू लागले आहेत. वर्क फ्रॉम करणारे लोक घरात वाय- फाय मॉडेमद्वारे लॅपटॉपला कनेक्ट करत आहेत. त्याच वाय-फाय नेटवर्कचा वापर स्मार्ट टीव्हीला कनेक्ट करून ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ, होस्टार आदीला अ‍ॅक्सेस केले जाते. हॅकर्स याच स्मार्ट टीव्हीद्वारे तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसखोरी करू शकतात. अशावेळी तुमच्याकडून झालेली एखादी छोटी चूकसुद्धा महागात पडू शकते. आता तुम्ही विचार करत असाल की, यापासून कसे वाचावे?

सतत बदला पासवर्ड

यापासून बचाव करण्यासाठी पहिला पर्याय म्हणजे आपल्या महत्वाच्या अकाऊंटचा पासवर्ड सतत बदलत राहा आणि ते नेहमी अल्फा न्यूमेरिक (नंबर आणि लेटर) आणि स्पेशल कॅरेक्टरच्या कॉम्बिनेशनने तयार करा. सोबत, बँकिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना प्रायव्हेट ब्राऊजिंग (इनकॉग्निटो मोड) चा वापर करा. जिथे तुम्हाला आपल्या खासगी डाटा अ‍ॅक्सेस करण्याची गरज आहे तेथे प्रायव्हेट ब्राऊजिंगचाच वापर करा. ब्राऊजरमध्ये कधीही आपला कोणताही अकाऊंट पासवर्ड सेव्ह करू नका. हॅकर्ससाठी ब्राऊजरमध्ये घुसखोरी करणे खुप सोपे असते. मागच्या वर्षी गुगल क्रोमद्वारे अनेक डाटा लीक्सच्या घटना समोर आल्या होत्या, ज्याच्यानंतर गुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरसाठी नवे अपडेट रोल आऊट केले होते.

व्हीपीएन नेटवर्कचा वापर करा

व्हीपीएन (वर्चुअल पर्सनल नेटवर्क) द्वारे सायबर अटॅकपासून वाचता येऊ शकते. व्हीपीएनद्वारे वर्क फ्रॉम होम करणार्‍या युजर्सने आपल्या कंपनीच्या क्लाऊड किंवा ऑफिस सर्व्हरला कनेक्ट झाले पाहिजे. परंतु, यासाठी तुमच्या व्हीपीएन नेटवर्कची सिक्युरिटी खुप मजबूत असणे गरजेचे आहे. सध्या टेलिकॉम कंपन्या आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स सुद्धा आपले नेटवर्क सुरक्षित करत आहेत. घरात वापरल्या जाणार्‍या वाय-फाय राऊटरची सिक्युरिटी वाढवण्यासाठी एसएसआयडीला पासवर्डने प्रोटेक्ट करा. यामुळे आपल्या आपके वाय-फाय राऊटरमध्ये घुसखोरी करणे अवघड होईल. सोबतच एसएसआयडीचा पासवर्ड सतत बदलत राहा.