Coronavirus : तेलंगणा 7 एप्रिलपर्यंत ‘कोरोना’मुक्त होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ‘विश्वास’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे तेलंगणा 70 रुग्ण असून 7 एप्रिलपर्यंत तेलंगणा राज्य कोरोनामुक्त होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर आतापर्यंत तेलंगणात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. 7 एप्रिलपर्यंत तेलंगणा राज्य कोरोनामुक्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. यांनी सांगितले की राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण या व्हायरसवर यशस्वीपणे मात देत आहेत. रुग्णांनी औषधांनाही चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. 22 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत आम्ही 25 हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. अनेक जणांची चाचणी केल्यानंतर 70 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 रुग्ण बरे झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी एखाद दोन रुग्ण वगळता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांनाही उपचारानंतर 7 एप्रिलपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या हाहाकारामुळे नागरिक भीतीखाली जीवन जगत आहेत. आतापर्यंत जगभरात 31 हजार लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांवर उपचार सुरू आहेत. भारतातही आतापर्यंत एक हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 203 वर गेली आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र त्यानंतर केरळ 182, कर्नाटक 76 आणि त्यानंतर .मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.