बलात्काराच्या आरोपावरून 2 महंतांना अटक

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अमृतसरमधील एका मंदिरातील महंताला आणि त्याच्या साथीदारांना बेकायदेशीरपणे दोन महिलांना कैदेत ठेवून वारंवार त्यांच्यावरती बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अमृतसर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. महंत गिरधारी नाथ म्हणून ओळखलं जाणाऱ्या मुख्य आरोपीची ओळख पटली असून, तो अमृतसरमधील लोपोके पोलीस ठाण्याअंतर्गत गुरु ज्ञान नाथ आश्रम वाल्मिकी तीर्थ येथे मुख्य महंत म्हणून कार्यरत होता. वरींदर नाथ असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो महंत गिरधारी नाथ याचा सहकारी होता, अशी माहिती पोलिसांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिली आहे.

पीडित महिलांनी पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य तरसेम सिंह यांना पत्राद्वारे कळविले होते की, त्यांना आश्रमात बेकादेशीरपणे डांबून ठेवण्यात आले असून, येथील महंत वारंवार आमच्यावरती बलात्कार करत आहे. या माहितीच्या आधारे तातडीने लोपोके पोलिसांनी कार्यवाही करत सोमवारी आश्रमावर छापा टाकला आणि पीडित महिलांना आश्रमातून मुक्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महंत गिरधारी नाथ आणि त्याचा साथीदार वरिंदर नाथ या दोघांना अटक केली असून, नछत्र सिंह आणि सुरज नाथ हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत अटारीचे डीसीपी गुरु प्रताप सिंह म्हणाले की, ‘तरसेम सिंह सलायका यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही आश्रमवरती छापा टाकला आणि दोघा आरोपीना अटक केली, जे पळून गेले आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या शक्यतो लपलेल्या ठिकाणावरती पोलीस हे छापे टाकत आहे’ असं त्यांनी सांगितलं. तर पोलीस सध्या महंत गिरधारी नाथ आणि वरिंदर नाथ यांची कसून चौकशी करत असून, यापूर्वी आश्रमात काय घडले याचा शोध पोलीस घेत आहे. आश्रमातील कागदपत्रे आणि ये-जा करणाऱ्या लोकांच्या नोंदी याचा पोलीस तपास करत आहे.